Saturday, October 9, 2010

संन्याश्याच्या लग्नाला शेंडीपासून तयारी अस म्हणतात ते काही खोट नाही. माझ्या बाबतीत संन्याश्याच  लग्न जरी नसल तरी तयारी मात्र इतकीच करावी लागली. खरेदी, डॉक्टर , लोन , स्वयंपाक , बैग भरणे, वजनात ती बसवणे इत्यादी गोष्टी करून झाल्यावर शेवटी एकदाचा १९ august उजाडला. आई बाबांचा एअरपोर्ट वर निरोप घेउन मी आत गेलो. आत गेल्यावर पहिली चिंता म्हणजे बैग वजनत बसतील की नाही ? नाही   बसल्या तर काय करायचा ह्याचा प्लान चालू होता पण ती वेळ आली नाही,  माझ्या बैग कार्गो luggage मधून USA साठी रवाना झाल्या. आता ह्यांच दर्शन USA मध्येच ! तेवढ्यात columbia ला जाणारे माझे मित्र भेटले, मग काय निवांत गप्पा चालू झाल्या. केबिन baggage च सिक्यूरिटी चेक पास करून आम्ही वेटिंग एरिया मध्ये आलो. तिथे थोड खावुन घेतल तेव्हड्यात आमच्या flight ची annoucement झाली. flight मध्ये जावून बसलो. वेळ रात्री १ वाजताची होती. १ वाजता विमानाने टेक-ऑफ करायला हवे होते पण काय झाल काय माहित ? तशी काही चिन्ह दिसेनात ! मग एक रुबाबदार  दिसणारा माणूस असा स्विस airways च white ड्रेस वगेरे घातलेला असा आला आणि त्यानी passanger counting चालू केल. मला वाटला हा pilot  वगेरे असावा. थोड्या वेळानी समजल की passanger काउंट हा त्याच्या रिकॉर्ड मध्ये असलेल्या काउंटशी जुळत नाहीये. म्हणजे राहिला वाटता कोणी तरी खाली.. माझ्या मनात विचार .. च्यायला कोण पनवती आहे हा ? पण ५ मिनिटांनी विमान चालू झाले. मला खिड़की ची जगा मिळाली होती . विमान बराच वेळ runway वर फिरत राहिले. कधी नागमोडी कधी सरळ, इकडून तिकडे .. सरळ जायला लागल की वाटे आत्ता उड़ेल पण कुठचा काय ? विमान खुप वेळ फिरून एक जागी जावून थांबल !! हे काय ? परत काय बोम्ब झाली की काय ? असा मनात विचार येत असतानाच विमान परत पुढे जाऊ लागले . pilot ने गेअर बदललेले लक्षात आले. विमानाचा वेग आता खुप वाढला आणि बघता बघता प्रचंड वेगाने विमान आकाशात झेपावल ! आणि क्षणारधर्त रात्रीची झगमगनारी मुंबई मला दिसू लागली. माझ्या मात्रूभुमिचे हे ह्या वेळासाठीचे शेवटचे दर्शन !! सुन्दर अर्ध चन्द्र कृति दिसणारा तो marine drive, रात्रीच्या दिव्यानी सजलेला तो वांद्रे वरली bridge ! डोळ्या आड़ जाई पर्यंत बघत होतो. हलू हलू मी आणि मुंबई ह्यांच्या मध्ये ढगांचा पड़दा आला. गुड बाय इंडिया ....

आता मी विमानाच्या आत लक्ष देवू लागलो. माझ्या समोर एक स्क्रीन होती आणि माझ्या डाव्या हाताच्या handle  खाली एक रिमोट होता. त्या रिमोट ची फ़क्त दोनच बटन दबता येत होती. prev आणि next .  बाकीची बटन handle च्या खाली होती. हे काय ? काय कलेना .. बराच वेळ खटाटोप केल्यावर कलाल की त्या handle  च्या बाजूला एक गुप्त button आहे ते दबला की ते रिमोट अपोआप वर येता !! हे कलेपरेन दुबई निघून गेला होत ! मग त्या TV वर थोडा टाइमपास करून मग मी झोपलो .

सकाळी ६ वाजता zurich एअरपोर्ट वर आम्ही आलो. उत् रच्या आधी सर्वांना स्विस choclate दिली . मी माझे ते pant
 च्या खिशात ठेवला .ढगाल हवा होती. परदेशात आल्याची पहिली जाणीव मला रेस्टरूम मध्ये गेल्यावर झाली !!! details ची गरज नाही पण नको तिकडे वाट्टेल तितका पानी आणि हवा तिथे साधा एक जेट सुध्हा नाही ? हे काय कलेना ! असो .
माझ्या पुढच्या flight ल ५ तासाचा अवधि होंता त्यामुले बराच वेळ मी zurich एअरपोर्ट आणि तिथली चालती बोलती प्रेक्षनीय स्थल पाहत बसलो. माझी नेक्स्ट flight स्विस airways चीच होती .. Zurich - JFK   .. विमानात फक्त टोटल ४ इंडियन होतो बाकि सर्व foriengers ! आणि flight दिवसा १२ वाजताची असल्याने ९ तासाची journey पूर्ण झगझगीत सूर्यप्रकाशात झाली. मला aisle  सीट मिळाली होती, विमानात लंच दिला पण माझ्या सीट ल ट्रे दिसेना .. च्यायला ही काय आणि कटकट ? मी बराच प्रयत्न केल पण मला माझा ट्रे कुठेही दिसेना ! शेवटी मी एयर होस्टेस ल बोलवाला आणि तिने हेंडले वरचा  एक छोटासा अगदी छोटा बटन दबला आणि माझ्या आर्म रेस्ट खालून तो ट्रे जादुगाराच्या टोपितुन ससा निघावा तसा बाहेर आला !! त्या एयर होस्टेस ने माझ्या कड़े बघून एक smile दिला आणि निघून गेली .. मी पण तिच्या कड़े लक्ष न देता समोर आलेल्या लंच वर focus केल . झाकली मुठ सव्वा लाखाची ! निवांत जेवलो , मस्त apple juice वगेरे घेतला आणि आता परत ते बटन दबला अन तो ट्रे काही आत जायला तयार नाही , बराच प्रयत्न केल पण नाहीच ! श्या .. परत एयर होस्टेस , परत तेच smile ..तिने एक बोटाने एक स्प्रिंग दाबली आणि झटकन तो ट्रे handle  च्या आत गेला !!! पुन्हा तेच smile देत ती निघून गेली ! जाऊ दे, मी पण जाणून बुजुन झोपायचा सोंग घेतला . झाकली मुठ .... असो  . 4pm ल JFK ला  पोहोचलो. तिथे immigration च्या लाइनमध्ये १ तास ३० मिनिटे उभे राहून अगदी अंत पाहिल्यावर माझा एकदाचा नंबर आला. तेव्हडयत एक मुलगी माझ्या पुढे आली आणि पुढे घुसली मी काही बोलायच्या आत ती पोहोचली पण काउंटर पाशी !! मी मनात विचार केला .. ओके ladies फर्स्ट ! ५ min झाली पण ती काही काउंटर वरून हटेना. तिची आणि त्या ऑफिसरची काही तरी बाचाबाची झाली , ती पुढे निघून गेली म्हणुन मी काउंटर पुढे आलो तर तो ऑफिसर एकदम heavy bass effect असलेल्या त्याच्या आवाजात म्हणाला , "one at a time , I will call your name then come, step back" वाह, अमेरिकेतला पहिला स्वागत ! ती मुलगी काउंटर पुढेच घुटमलत होती , तो ऑफिसर तिला म्हणाला (with bass effect voice)" I have asked you to go and see the authority, why you are standing here ? Don't waste my time, go !" छान , म्हणजे हा माणूस आधीच तापलय आणि आत्ता आपण त्याच्या पुढे , all the best prasad .. त्याने माझा पासपोर्ट आणि वीसा डोळे बारीक़ करत पहिला , त्याच्या कंप्यूटर वर काहीतरी टाइप केला आणि १-२ मिनट भयाण शांततेत गेल्यावर त्याने माझा पासपोर्ट परत केला with DS-94 i.e. Entry to USA is permitted ! चला एक काम तरी झाल .. आता कस्टम ऑफिसर .. त्याने परत माझा वीसा चेक केला आणि काहीही न विचारता OK असा इशारा दिला आणि मी तिथून सुटलो . बग्स घेउन बाहेर आलो , आत्ता मित्राला फ़ोन करायचा होंता की मी तक्सी घेउन येतोय तू घरीच रहा , मी माझा मोबाइल काढला , आणि पाहतो तर काय ? मी जे ग्लोबल calling कार्ड घेतल होंता ( Rs २०००/- देऊन ) त्यात balancech नव्हता !! आत्ता फ़ोन कसा करू ? थोडा विचार केला, तिथल्या एक काउंटर वरून $१० भरून calling कार्ड घेतल , आणि पे फ़ोन पाशी गेलो . पण पाहतो तर काय ? तिथे coin insert करायला slit  नाही की कार्ड swipe करायला slot नाही, आत्ता कॉल करू कसा ? तिथे आपला अड़ाणीपण समोर आल, लोक माझ्या कड़े एवढा शिकला सावरलेला दिसतोय आणि साधा फ़ोन नाही लावता येत असा विचार करतात की काय असा मला वाटल !
शेवटी मी एक लदी पोलिसे ऑफिसर ला बोलवाला आणि तिला मला ह्या नंबर वर ह्या कार्ड थ्रू कॉल करायचा आहे, हेल्प करा असा सांगितला. तिने ते कार्ड घेतल आणि अमेरिकेच्या झेंदयाची डिजाईन असते त्यावरून तिचे नख घासले आणि त्या मागे एक पिन कोड लपला होंता तो तिने ड़ाल केला आणि मग मित्राचा नंबर लावला, २ min च काम आणि मी १० मीन त्या फ़ोन बूथ वर घेलत होतो त्या फ़ोनशी , कधी खाली बाघ कधी वर, कुठे coin टाकता येतो का , कुठे कार्ड टाकता येता का .. पण शेवटी एकदाचा बोलना झाल आणि मी तिथून उठालो , समोर चलत गेलो तर एक अतिशय धिप्पाद नीग्रो समोर आल आणि म्हणाला "where you want to go ? " मला एकदम पुणे स्टेशन मधून बाहेर आल्यावर रिक्शा वाले जसे अंगावर येतात त्याची आठवण झाली , मी त्याला चुक्वायाला मी बोललो कुठे नाही , आणि पटकन रेस्टरूम मध्ये घुसलो :) थोड्या वेलने डोकावून पाहिले तर तो नीग्रो माझी वाट बघत बाहेरच वाट बघत होंता , च्यायला ... मग मी अजुन थोडा टाइमपास केला रेस्टरूम मध्ये , इथे दार अपोअप उघडते , नलातुन पानी अपोआप येते , जेट मधून सोअप आपोआप येतो, मशीन मधून tissue आपोआप येतो .. आणि शेवटी blower पण आपोआपच चालू होतो,, च्यायला बर आहे , फक्त करायला मात्र आपला आपण लगता , बाकि सगला आपोआप !!! मग मी परत बाहेर आलो तर तो नीग्रो निघून गेला होंता .. मी बाहेर पडलो आणि एअरपोर्ट च्या एक्सिट मधून बाहेर आलो .. वाह .. २१ तासां नंतर natural हवा  आणि सूर्यप्रकाश .. मी छाती भरून श्वास घेतला , आणि मनात म्हटला ..
शेवटी गाठली एकदाची अमेरिका !!!!  Welcome to USA .....

3 comments: